Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलाच्या नावावरून पती-पत्नीचे नाते घटस्फोटापर्यंत पोहोचले

court
, सोमवार, 16 डिसेंबर 2024 (18:44 IST)
आपण हे ऐकलेच असेल की नावात काय आहे? ही ओळ प्रसिद्ध लेखक शेक्सपियरची आहे. नावाचे आयुष्यात खूप महत्त्व आहे. मुलाच्या नावावरून पती-पत्नीमध्ये एवढा वाद झाला की हे प्रकरण थेट कोर्टात पोहोचले. दोघांमधील प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले होते, जे न्यायालयाने आपल्या शहाणपणाने सोडवले आणि दाम्पत्यातील भांडण संपवले.चला जाणून घेऊ या काय आहे हे प्रकरण ते  

म्हैसूर जिल्ह्यात 2021 मध्ये दाम्पत्याच्या घरी एका मुलाचा जन्म झाला. यानंतर आई झालेल्या महिलेने आपल्या मुलाला 'आदि' म्हणायला सुरुवात केली. मात्र या मुलाचे नाव अधिकृतरीत्या कुठेही नोंदवले गेले नाही. मुलाच्या वडिलांना हे नाव आवडले नाही आणि येथूनच प्रकरणाला सुरुवात झाली. नावावरून दोघांमध्ये भांडण झाले. वास्तविक पतीला आपल्या मुलाचे नाव शनिदेवाचे नाव असावे असे वाटत होते. त्यानंतर दोन वर्षे नावाबाबत दोघांमध्ये वाद सुरू होता.

इंग्रजी वृत्तपत्रानुसारमुलाच्या नावाचे प्रकरण इतके वाढले की महिलेने सीआरपीसी कलम 125 अंतर्गत न्यायालयात धाव घेतली. मात्र तेथे न्यायालयाने दोघांमध्ये समेट घडवून आणला.त्यांनी मुलाचे काही नावे दाम्पत्याला सुचवली पती-पत्नी दोघांनीही मुलाचे नाव 'आर्यवर्धन' ठेवण्याचे मान्य केले. गेल्या शनिवारी  सर्वांच्या संमतीने एका 3 वर्षाच्या मुलाचे नाव आर्यवर्धन ठेवण्यात आले. यानंतर हे जोडपे त्यांच्यातील भांडण विसरून गेले आणि त्यानंतर त्यांच्यात समेट झाला.
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: संजय राऊत यांनी सरकारवर संविधान विरोधी असल्याचा आरोप केला