Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी घरात घुसून केली माजी SPO आणि त्यांच्या पत्नीची हत्या

पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी घरात घुसून केली माजी SPO आणि त्यांच्या पत्नीची हत्या
, सोमवार, 28 जून 2021 (10:30 IST)
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी एका माजी विशेष पोलिस अधिकाऱ्याच्या घरात घुसून त्यांची हत्या केली आहे. या हल्ल्यात या माजी अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान त्यांच्या पत्नीचा रुग्णालयात मृत्यू झाला तर एसओपींची मुलगी गंभीर जखमी झाल्याची बातमी आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी पुलवामा येथील हरिपरीग्राम गावात स्थित माजी एसपीओ फैयाज अहमद यांच्या घरी पोहोचले आणि तिथे त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबारात फैयाज अहमद यांचा जागीचं मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फैयाज अहमद यांच्या पत्नीने रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मुलगी गंभीर जखमी असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली आहे.
 
जम्मूच्या सतवारी परिसरातील एअरफोर्स बेसवर झालेल्या शक्तीशाली ड्रोन स्फोटानंतर ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या ड्रोन स्फोटामागे पाकिस्तानी दहशतवादी संघटना असल्याची माहिती समोर येत आहे. ड्रोनच्या सहाय्याने झालेला पहिला स्फोट पहाटे १.४० च्या सुमारास झाला. या स्फोटात जवळच्या विमानतळच्या तांत्रिक भागातील इमारतीचे छत कोसळले. या जागेची देखभाल भारतीय वायुसेना करत होती. 
 
त्यादरम्यान दुसरा स्फोट अगदी सहा मिनिटांनी घडवण्यात आला. हा दुसरा स्फोट जमिनीवर झाला. मात्र यात वायुसेनेचे दोन जवान जखमी झाले. जम्मू विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय सीमा यादरम्यानचं हवाई अंतर १४ किलोमीटर आहे. त्यामुळे एवढे अंतर पार करत हे ड्रोन याठिकाणी पोहचले कसे याचा तपास सुरु आहे. सध्या तपास यंत्रणा दोन्ही ड्रोनच्या हवाई मार्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेअर बाजाराची विक्रमी सुरुवात सेन्सेक्सने आणखी एक नवीन शिखर गाठला