भारतात गेल्या दहा वर्षांत प्रजनन दर 20 टक्क्यांनी घसरला आहे. 1000 प्रजननक्षम स्त्रियांमध्ये किती मुलं जन्माला आली यावरून हा दर ठरतो. गेल्या दहा वर्षांत हा 86.1 वरून 68.7 वर आला आहे. सँपल रजिस्ट्रेशन सिस्टिमने ही माहिती दिली आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात हा दर जास्त आहे.
एम्स दिल्लीच्या स्त्रीरोग विभागाच्या माजी प्रमुख डॉ. सुनीता मित्तल यांनी ही माहिती म्हणजे लोकसंख्या कमी होत असल्याचं लक्षण असून ते चांगलं असल्याचं म्हटलं आहे. लग्नाचं वय वाढलं आहे, अनेक गर्भनिरोधक उपाय यामुळे हा बदल झाल्याचं त्या म्हणाल्या.
जम्मू काश्मीर भागात हा दर सर्वाधिक आहे (29.2) तर दिल्ली (28.5) आणि उत्तर प्रदेशमध्ये (24) आणि झारखंडमध्ये (24 ) आहे .