Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जम्मू -काश्मीर मध्ये बर्फवृष्टीत भारतीय जवान सज्ज, व्हिडीओ व्हायरल

जम्मू -काश्मीर मध्ये बर्फवृष्टीत भारतीय जवान सज्ज, व्हिडीओ व्हायरल
, रविवार, 9 जानेवारी 2022 (12:24 IST)
सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी आहे. लोक थंडीमुळे घराबाहेर पडण्याचा विचारही करत नाही. जम्मू काश्मीर मध्ये बर्फवृष्टीमुळे अनेक भागात बर्फ़ाची चादर पसरली आहे. अशा भीषण वातावरणात देखील आपल्या देशाचे जवान आपल्या सुरक्षेसाठी  सज्ज आहे. दरम्यान संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने या जवानांचा व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये कठीण परिस्थितीतही जवानांचे धैर्य स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये हे जवान गस्त घालत आहे. ट्विटरवर अपलोड केलेला व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, सैनिकांच्या या धैर्याचे  ट्विटर युजर्स कडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.  या व्हिडिओमध्ये कुपवाडा सेक्टर मध्ये नियंत्रण रेषेजवळ सुमारे 17 हजार फूट उंचीवर भारतीय लष्कराची चौकी उभारली आहे. 
व्हिडिओमध्ये एक जवान एलओसीवर लक्ष ठेवून आहे. त्याच्या घुडक्यापर्यंत बर्फच बर्फ आहे. वरून बर्फ पडत आहे. येथे अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा 6 ते 10 अंशांनी घसरले आहे. कडाक्याच्या थंडीमुळे डोंगराळ भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे, मुसळधार बर्फवृष्टी दरम्यान जवान नियंत्रण रेषेवर सतत गस्त घालत आहे. 
बर्फवृष्टीमुळे नियंत्रण रेषेवरील अनेक भागात बर्फाची चादर पसरली आहे. या भागात घुसखोरी होऊ नये म्हणून केरन सेक्टरमध्ये जवानांची सतत गस्त सुरू आहे. लष्कराने एक व्हिडीओ जारी केला आहे ज्यामध्ये सैनिक सुरक्षेमध्ये कसे गुंतलेले आहेत हे स्पष्टपणे दिसत आहे. सैनिक नियंत्रण रेषेवर स्नो स्कूटरचीही मदत घेत आहेत. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Maharashtra Omicron Guidelines: राज्यात आजपासून नवीन निर्बंध लागू, नियम मोडल्यास कठोर कारवाई