Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 6 April 2025
webdunia

मदर तेरेसा यांच्या संस्थेच्या प्रमाणपत्राचं नूतनीकरण

Renewal of Mother Teresa's Certificate of Institution मदर तेरेसा यांच्या संस्थेच्या प्रमाणपत्राचं नूतनीकरणMarathi National News In Webdunia Marathi
, रविवार, 9 जानेवारी 2022 (10:42 IST)
नोबेल विजेत्या संत मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या मिशनरीज ऑफ चॅरिटी (एमओसी) या संस्थेची परदेशी देणगी नियमन कायद्यानुसारची (एफसीआरए) नोंदणी केंद्र सरकारने गुरुवारी पुन्हा नियमित केली.
परदेशी देणगी स्वीकारण्याबाबतचे संस्थेचे प्रमाणपत्र आता 2026च्या अखेपर्यंत वैध असेल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
प्रतिकूल बाबींचे कारण देत मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या परदेशी देणगी नोंदणीचे नूतनीकरण करण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने सुमारे दोन आठवड्यांपूर्वी नकार दिला होता
कोलकातास्थित 'मिशनरीज ऑफ चॅरिटी' संस्थेबद्दलच्या माहितीनुसार संस्थेच्या 'एफसीआरए' प्रमाणपत्राचे नुतनीकरण करण्यात आले असून ते आता 1 जानेवारी 2022 पासून 31 डिसेंबर 2026 पर्यंत वैध असेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गोवा, उत्तर प्रदेशात शिवसेना निवडणूक लढणार-राऊत