जवळपास ९ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२ मध्ये शीना बोराची हत्या करण्यात आली होती. सीबीआयनं सखोल तपास करून शीना बोराची हत्या झाल्याचं सिद्ध केलं होतं. त्याच गुन्ह्याखाली तिची आई इंद्राणी मुखर्जी सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. पण इंद्राणीनंच शीना बोरा जिवंत असल्याचा दावा करणारं पत्र पाठवल आहे.
सध्या तुरुंगात हत्येसाठीची शिक्षा भोगत असलेल्या इंद्राणी मुखर्जीनं सीबीआयला पत्र लिहून शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केला आहे. तुरुंगातल्या एका महिलेने शीना बोराला आपण काश्मीरमध्ये पाहिल्याचं आपल्याला सांगितलं आणि त्याच आधारावर आपण हे पत्र लिहीत असल्याचं इंद्राणीनं म्हटलं आहे. तसेच, शीना बोराचा काश्मीरमध्ये तपास करण्यात यावा, अशी विनंती देखील इंद्राणीनं सीबीआयकडे केली आहे. पत्रासोबत इंद्राणीनं सीबीआयच्या विशेष कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे.