"हिंदू समाजाच्या श्रद्धा केंद्रांचा अनेक वर्षांपासून अपमान करण्यात आला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून अशा स्थळांचं नूतनीकरण केलं जातंय," असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहमदाबादमधील एका कार्यक्रमात बोलत होते.
पूर्वी लोक मंदिरात जाण्यास टाळाटाळ करत होते, परंतु मोदी सरकारमुळे नवीन युग सुरू झाल्याचंही अमित शाह म्हणाले.
अहमदबादमधील कडवा पाटीदार पंथाची देवी 'माँ उमिया' यांना समर्पित उमियाधाम मंदिराची पायाभरणी समारंभात अमित शाह बोलत होते. 1500 कोटी रुपये खर्च करून हे मंदिर उभारले जात आहे.
"मंदिरे ही केवळ धार्मिक श्रद्धेची केंद्रेच नाहीत, तर ती समाजसेवेची आणि जीवनातून निराश झालेल्या लोकांसाठी त्यांच्या अडचणींवर मात करून पुढे जाण्यासाठी ऊर्जा देणारी केंद्रे आहेत," असं प्रतिपादनही अमित शाह यांनी यावेळी केलं.