दिल्लीमधील आयटीओ परिसरात पोलिस आणि आंदोलनकार्यांमध्ये संघर्ष पेटला असून आता चिघळलेली परिस्थिती बघता गृहमंत्रालयाकडून दिल्लीतील सिंघू, टिकरी, गाझीपूर बॉर्डर, नांगलई, मुकरबा चौक परिसरातील इंटरनेट सेवा आज रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच इंडिया गेटकडे जाणारे सर्व रस्ते बंद ठेवण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आणि राष्ट्रपती भवनाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला ठिकठिकाणी हिंसक वळण लागलं असून पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळत आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
आयटीओ परिसरात ट्रॅक्टर चालवणाऱ्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा ट्रॅक्टरचा कोलमडला. आयटीओ परिसरात आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर करण्यात येत होता. या शेतकऱ्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.