मुंबई 9 ऑक्टोबर 2023: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) ने भारतात ऑलिम्पिक वॅल्यु एज्युकेशन कार्यक्रम (OVEP) यशस्वी करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनशी हातमिळवणी केली आहे. या आघाडीत ऑलिम्पिक संग्रहालयाचाही समावेश करण्यात येणार आहे. भागीदारांनी सहकार्य करारावर स्वाक्षरी केली. हा करार तरुणांमध्ये खेळाच्या माध्यमातून ऑलिम्पिक मूल्यांना पुढे नेण्यासाठी काम करेल.
आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी मुंबईतील रिलायन्स फाऊंडेशन यंग चॅम्प्स (RFYC) फुटबॉल अकादमीला भेट दिली. यादरम्यान, त्यांनी आणि भारतातील IOC सदस्य आणि रिलायन्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नीता अंबानी यांनी या नवीन सहकार्यावर आपली सहमती व्यक्त केली. समारंभात अध्यक्ष बाख आणि श्रीमती अंबानी यांनी ओवीईपी आणि रिलायन्स फाऊंडेशनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पेनंटची देवाणघेवाण केली.
या प्रसंगी बोलताना अध्यक्ष बाख म्हणाले, “खेळांमध्ये तरुणांचे जीवन बदलण्याची क्षमता आहे. रिलायन्स फाऊंडेशनचे ओवीईपी अंमलबजावणी भागीदार म्हणून आमच्यात सामील होण्यासाठी आम्ही स्वागत करतो आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना ऑलिम्पिक मूल्यांबद्दल माहिती देण्यासाठी उत्सुक आहोत. ते. प्रथम मुंबई भागात लागू केले जाईल आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्रात पसरवले जाईल. आदर, मैत्री, खेळ आणि एकत्रता ही मूल्ये आहेत ज्याचा फायदा तरुणांना त्यांच्या आयुष्यभर करता येईल आणि अंगीकारता येईल. आणि सर्वात महत्त्वाचे पैलू एकता आहे.”
ते पुढे म्हणाले, "ऑलिम्पिक बोधवाक्यातील 'टूगेदर' हा शब्द एकतेची भावना व्यक्त करतो. ओवीईपी कार्यक्रमाद्वारे, आम्ही सर्व मुले आणि तरुणांपर्यंत पोहोचू इच्छितो, विशेषत: वंचित पार्श्वभूमीतील, ज्यांना सामान्यतः खेळांमध्ये आणि निरोगी जीवनशैलीत प्रवेश मिळत नाही."
रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती नीता अंबानी म्हणाल्या, “ओवीईपीसाठी आयओसीसोबत भागीदारी करताना रिलायन्स फाऊंडेशनला आनंद होत आहे. ओवीईपी क्रीडा आणि शिक्षण या दोन्हींना एकत्र आणते. या भागीदारीमुळे आम्ही भारतातील 25 कोटी शाळांना मदत करण्यास उत्सुक आहोत. मुलांवर याचा सकारात्मक परिणाम होण्याची आम्ही वाट पाहत आहोत. हा कार्यक्रम भारतातील दुर्गम खेडे आणि गावाच्या भागात पोहोचेल आणि मुलांना अधिक शिस्तबद्ध, निरोगी, तंदुरुस्त आणि अधिक समग्र जीवनशैली पर्याय प्रदान करेल. मुलं हे आपले भविष्य आहेत आणि आपण त्यांना शिक्षणाचा अधिकार आणि खेळण्याचा अधिकार दिला पाहिजे ”
हा प्रसंग खास बनवण्यासाठी, सुमारे 80 आरएफवाईसी(RFYC) विद्यार्थी, रिलायन्स फाऊंडेशन शाळांमधील 100 हून अधिक मुले आणि त्यांच्या एनजीओ (NGO ) भागीदारांनी एकत्रितपणे खेळात भाग घेतला. “त्यांनी मिळून खो-खो, गल्ली क्रिकेट आणि मलखांब सारखे आधुनिक आणि पारंपारिक भारतीय खेळही खेळले.”
ओवीईपी हा ऑलिंपिक संग्रहालयाच्या नेतृत्वाखालील एक उपक्रम आहे जोआईओसी च्या ऑलंम्पिज्म 365 धोरणाला पुढे आणतो, ज्याचा उद्देश खेळात प्रवेश वाढवणे आणि शारीरिक क्रियाकलापांच्या माध्यमाने आरोग्य आणि सामाजिक फायदे जगभरातील समुदायांपर्यंत पोहोचवणे आहे. हे 2022 मध्ये भारताच्या ओडिशा राज्यात अभिनव बिंद्रा फाउंडेशनसह लॉन्च करण्यात आले. ओवीईपी(OVEP) हा भारतात राबविल्या जाणाऱ्या पहिल्या मोठ्या आईओसी(IOC )प्रकल्पांपैकी एक आहे.
ओडिशाच्या विद्यार्थ्यांसाठी ओवीईपी लाँच केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनंतर, शाळांमध्ये उपस्थिती आणि खेळातील सहभाग, विशेषत: मुलींमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली. हा कार्यक्रम, आता त्याच्या दुसऱ्या वर्षात, 350 शाळांमधील 700 शिक्षक आणि 250,000 मुलांपर्यंत पोहोचला आहे. त्याचा विस्तार आसाम राज्यापर्यंत झाला आहे. एकदा पूर्णपणे लागू झाल्यानंतर, ओवीईपी अंदाजे 29 कोटी मुलांना जोडण्याची शक्यता आहे.
आयओसी आणि रिलायन्स फाऊंडेशनची तीन मुख्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याची योजना आहे:
• ऑलिम्पिझम आणि ऑलिम्पिक मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि व्यवहारात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी निवडलेल्या शाळांमध्ये ग्रेड क्रियाकलाप घेणे.
• शारीरिक क्रियाकलापांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ऑलिम्पिक मूल्यांवर चर्चा करण्यासाठी खेळाडू आणि विद्यार्थ्यांमध्ये आभासी आणि वैयक्तिक सत्रे घेणे.
• क्रीडा आणि शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये परस्परसंवादी खेळ, प्रश्नमंजुषा आणि कार्यशाळांद्वारे ऑलिम्पिक मूल्यांबद्दल जागरूकता वाढवणे आहे .