Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निवडक आजारांवर उपचाराचे दर समान केले जाणार

निवडक आजारांवर उपचाराचे दर समान केले जाणार
, शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019 (10:35 IST)
यापुढे रुग्णालयांना आणि वेगवेगळ्या विमा कंपन्या समान उपचार दर ठेवणे आवश्यक असणार आहे. विमा नियामकच्या मते, (IRDAI) असे नियम बनवण्यात येत आहेत. यामध्ये सर्व रुग्णालयात काही निवडक आजारांवर उपचाराचे दर समान केले जाणार आहेत. सध्या वेगवेगळे दर असल्याने, विमा असूनही रुग्णालये, रुग्णांकडून वेग-वेगळं शुल्क आकारतात. 
 
एक रुग्णालय-एक फी या नियमांमुळे सामान्य लोकांना फायदा होणार आहे. या नियमांमुळे, रुग्णालयातून जो वायफळ चार्ज आकारला जातो त्यावर रोख लावण्यात येईल. IRDAIच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, रुग्णालयात मोतीबिंदू, हर्निया, मुतखडा, किडनी ट्रान्सप्लांट यांसारख्या आजारांचे एकच दर ठेवण्यात येणार आहेत. यामुळे विमा कंपन्यांना, रुग्णालयात कोणत्या आजारासाठी किती खर्च येणार, आणि रुग्णांनाही त्यांच्या आजारासाठी किती खर्च येणार याची माहिती मिळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ट्विटरवर राज्यातले राजकरण ट्रेंडिंगमध्ये