Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

२६ जानेवारीला नाईट लाईफ सुरू करणे शक्य नाही

It is not possible to start nightlife on January26th
, सोमवार, 20 जानेवारी 2020 (10:18 IST)
येत्या २६ जानेवारीला नाईट लाईफ सुरू करणे शक्य होणार नाही. पोलीस यंत्रणांवर याचा किती ताण येईल याचा आढावा घेतला जाईल’, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. मुंबईमध्ये एका कार्यक्रमादरम्यान गृहमंत्र्यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर २६ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफला चक्क गृहमंत्र्यांनीच  शक्य नसल्याचे सांगितले आहे.
 
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘आम्ही लवकरात लवकर या योजनेबाबत आढावा घेऊ. त्यानंतर या योजनेची अंमलबजावणी करायची की नाही यावर निर्णय घेऊ, असे सांगत येत्या २६ जानेवारीपर्यंत या योजनेची अंमलबजावणी होऊ शकेल, असे मला वाटत नसल्याचे सांगितले. तसेच हा विषय कॅबिनेटमध्ये आल्यानंतर त्यावर तिथे सविस्तर चर्चा होईल असे गृहमंत्र्यांनी सांगितले. तसेच कॅबिनेटमध्ये जेव्हा हा विषय चर्चेला येईल तेव्हा त्याचा यंत्रणेवर किती परिणाम होऊ शकतो? यंत्रणा किती वाढवावी लागेल? याचा विचार होईल आणि त्यानंतरच या योजनेची अंमलबजावणी करायची की नाही यावर निर्णय होईल, असे अनिल देशमुख यावेळी म्हणालेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'हा' प्रस्ताव शिवसेनेला २०१४ मध्ये दिला होता : पृथ्वीराज चव्हाण