देशभरातील अनेक बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दहशतवादी डॉ. जलीस अन्सारी हा मुंबईतून फरार झाला आहे. जलीस अन्सारी हा अजमेर जेलमधून पॅरोलवर बाहेर आला होता. यानंतर महाराष्ट्र एटीएस, मुंबई क्राईम ब्रँचसह सर्व सुरक्षा एजेन्सीद्वारे अलर्ट जारी करण्यात आला आहे. कुख्यात गुंड जलीस अन्सारी याला अजेमर बॉम्बस्फोटाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जलीसचा 50 सिरीअल बॉम्बस्फोटात हात आहे. दरम्यान तो फरार झाल्याने देशावर अनेक धोके निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शुक्रवारी डॉ. जलीस अन्सारीचा पॅरोल संपणार होता. त्यानंतर त्याला अजमेर जेलमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र गुरुवारी सकाळी 5च्या सुमारास तो बेपत्ता झाला. त्याच्यावर 1992 पासून त्याच्यावर 6 बॉम्बस्फोटाचे गंभीर आरोप होते.