Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 31 March 2025
webdunia

जम्मू-काश्मीर: सुट्टीवर असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळ्या झाडून हत्या

Jammu and Kashmir: CRPF personnel on leave shot dead जम्मू-काश्मीर: सुट्टीवर असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळ्या झाडून हत्या Marathi National News  In Webdunia Marathi
, शनिवार, 12 मार्च 2022 (23:43 IST)
जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात शनिवारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी ही माहिती दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "संध्याकाळी 7.35 च्या सुमारास दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील चेक छोटापोरा भागात दहशतवाद्यांनी CRPF जवान मुख्तार अहमद यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला." त्यावेळी मुख्तार त्याच्या घरीच होते.
     
गंभीर जखमी मुख्तार अहमद यांना तातडीने शोपियान जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, असे  पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सीआरपीएफ जवान रजेवर असून ते  त्यांच्या घरी आले होते . ते म्हणाले की, परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जम्मू काश्मीर : चकमकीत 4 दहशतवादी ठार, 1 ला अटक