Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 10 April 2025
webdunia

श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या नाका पार्टीवर ग्रेनेड हल्ला, दोन जखमी

Grenade attack on security forces party in Srinagar
श्रीनगर, जं. , बुधवार, 23 मार्च 2022 (22:22 IST)
नगरमधील रैनावरी भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या नाका पार्टीवर ग्रेनेडने हल्ला केला आहे. या हल्ल्यात सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले असून, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हल्ल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पसार झाले. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली आहे.
 
दरम्यान, श्रीनगरमधील बेमिना भागात पोलिसांनी एका दहशतवाद्याला ग्रेनेडसह पकडले आहे. आतापर्यंत त्याची ओळख सार्वजनिक करण्यात आलेली नाही. त्याची चौकशी सुरू आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या रैनावरी भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या नाका पार्टीवर अचानक ग्रेनेड फेकले. यामध्ये सुरक्षा दलाचे दोन जवान किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेनंतर संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री काळाराम संस्थानतर्फे यंदा पाडव्याला साजरा होणार वासंतिक नवरात्रोत्सव