Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संरक्षण मंत्रालयाने जवानांकडे दुर्लक्ष केले : कॅगचा अहवाल

संरक्षण मंत्रालयाने जवानांकडे दुर्लक्ष केले : कॅगचा अहवाल
, मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020 (11:34 IST)
सियाचिन, लडाख आणि डोकलाम यांसारख्या अतिउंच क्षेत्रात देशाच्या संरक्षणासाठी तैनात असणाऱ्या जवानांना आवश्‍यकतेनुसार जेवण मिळत नसल्याचे उघड झाले आहे. 
 
संसदेत कॅगचा हा अहवाल मांडण्यात आला. या अहवालात जवानांना पुरेसे कपडे, बूट, स्लीपिंग बॅग आणि जेवणही मिळत नसल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. अतिउंच क्षेत्रात जवानांना रेशनचे विशेष स्केल त्यांची रोजची एनर्जी पाहून ठरविले जाते. म्हणजेच, जवानांना कॅलरीज्चे प्रमाण वाढवण्यासाठी खास जेवण आणि पर्यायी खाद्यपदार्थ दिले जाते. पण, संरक्षण मंत्रालयाने याकडे दुर्लक्ष केल्याचे कॅगचे म्हणणे आहे. 
 
सियाचिन येथील भागात तर वर्षभर बर्फच असतो. त्यामुळे याठिकाणी ज्याप्रकारच्या कपड्यांची गरज जवानांना भासते. ते कपडे खरेदी करण्यास सरकारला खूप उशिर झाला. तसेच, जुने स्पेसिफिकेशनचे कपडे आणि उपकरणे मिळाल्याने जवानांना चांगल्या दर्जाचे कपडे आणि उपकरणांपासून वंचित राहावे लागल्याचेही समोर आले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुणालने चक्क राज ठाकरे यांना दिली वडापावची ‘लाच’