Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेईई मेन आणि नीट परीक्षा आता जूनमध्ये शक्य

जेईई मेन आणि नीट परीक्षा आता जूनमध्ये शक्य
नवी दिल्ली , मंगळवार, 21 एप्रिल 2020 (08:52 IST)
लाखो विद्यार्थी जेईई मेन आणि नीट परीक्षांच्या तारखांची वाट पाहत आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देश 3 मे पर्यंत लॉकडाऊन स्थितीत आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीसदेखील या परीक्षा होण्याची शक्यता मावळली आहे. जेईई मेन आणि नीट परीक्षा आता जून महिन्यात आयोजित केल्या जाऊ शकतात. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी ही माहिती दिली आहे.

पोखरियाल यांनी टि्वट करून सांगितले आहे की, आता विद्यार्थ्यांची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जेईई मेन परीक्षा जूनमध्ये होण्याची शक्यता आहे.

अन्ह एका टि्वटमध्ये म्हणतात, जेईई मेन आणि नीट परीक्षेसंदर्भात  मंत्रालय सर्व संबंधितांच्या संपर्कात आहे. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर   परीक्षेच्या तारखांची घोषणा करण्यात येईल. यापूर्वी जेईई मेन आणि नीट परीक्षा मेच्या अखेरच्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार होती. मात्र परिस्थिती आटोक्यात न आल्याने आता या परीक्षांचे आयोजन जून महिन्यात होण्याची शक्यता आहे.

नियोजित वेळापत्रकानुसार जेईई परीक्षा 5,7,9 आणि 11 एप्रिलला होणार होती तर नीट परीक्षा 3 मे रोजी होती. पण देशभरात पहिल्या टप्प्यातील लॉकडाउन 14 एप्रिलपर्यंत होता आणि दुसर्‍या टप्प्यातील लॉकडाउन 3 मे रोजी संपणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मल्ल्याचे दिवस भरले; प्रत्यार्पण एक पाऊल दूर