Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही
, शनिवार, 4 एप्रिल 2020 (12:33 IST)
कोरोनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. मात्र कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही अशी माहिती विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी यांनी दिली.
 
कोरोनामुळे सरकारने सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीरकेली आहे. मात्र ही सुट्टी जाहीर होण्यापूर्वी कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखांच्या पदवी परीक्षा सुरु होत्या. तर पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा अद्याप सुरु झालेल्या नाही. यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रथम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कोणत्याही अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द केल्या जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.
 
कोरोनामुळे सर्व विद्यापीठांच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. मात्र भविष्यात सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहे. पण या परीक्षा कशा पद्धतीने घेतल्या जाव्या? यासंदर्भात विद्यापीठाकडून प्राध्यापक, प्राचार्य यांच्याकडून सूचना व उपाय मागवण्यात आल्या होत्या. यात विद्यापीठाला 100 पेक्षा जास्त सूचना आणि उपाय विद्यापीठाला प्राप्त झाले आहेत. यांची छाननी करुन नवीन परीक्षा पद्धती ठरवली जाणार आहे. लॉकडाऊनंतर या सर्व परीक्षा नवीन वेळापत्रकानुसार घेतल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना लॉकडाऊननंतर परीक्षेला सामोरी जावे लागणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली