Publish Date: Mon, 07 Nov 2016 (10:59 IST)
Updated Date: Mon, 07 Nov 2016 (11:01 IST)
जम्मू काश्मीरमधील शोपियन येथे सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. यात हिजबूल मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे. तर दोन जवान जखमी झाले आहेत.
शोपियन जिल्ह्यातील वनगम गावात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. मध्यरात्रीपासून चकमक सुरु आहे.