केरळच्या त्रिशूर मध्ये मारोतीचल भागात गुरुवारी सकाळी एका 76 वर्षीय व्यक्तीच्या खिशात ठेवलेला मोबाईल फोन मध्ये स्फोटहुन त्याला आग लागली. सदर व्यक्ती एका दुकानात चहा पीत असताना ही घटना घडली. सुदैवाने वृद्ध व्यक्तीस काही झाले नाही.
वृत्तानुसार, औल्लूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेलंय माहितीनुसार, घटनेची माहिती मिळतातच त्यांनी वृद्धाला फोन करून माहिती विचारली.
वृद्धाने सांगितल्याप्रमाणे त्याने हा फोन एक वर्षांपूर्वी 1000 रुपयांना विकत घेतला होता. या फोन मध्ये कोणतीही समस्या नव्हती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला सून काही टीव्ही चॅनल मध्ये ही घटना दाखवण्यात आली आहे.
या व्हिडीओ मध्ये दिसत आहे की एक व्यक्ती दुकानात खुर्चीवर बसून चहा आणि नाश्ता घेत आहे. अचानक शर्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलफोनचा आवाज झाला आणि त्यात स्फोट झाला.आणि आग लागली.
अचानक घडलेल्या घटनेमुळे वृद्धला धक्का पोहोचला आणि त्याने तातडीने शर्टच्या खिशातील फोन फेकून देत आपला जीव वाचवला. दुकानातही इतर व्यक्ती फोन वर पाणी टायकून आगीवर नियंत्रण मिळवत आहे.