कुंभमेळ्याला सुरुवात झालीय. यामध्ये गंगेमध्ये जाऊन स्नान करणाऱ्या भाविकांनी तीन डुबक्या मारून बाहेर पडावं, असं सांगण्यात आलंय.
मकरसंक्रांतीच्या दिवशी सुमारे सात लाख भाविकांनी हरिद्वारमध्ये गंगास्नान केल्याची माहिती उत्तराखंडच्या माहिती विभागाने दिल्याचं सांगितले जात आहे.
कुंभमेळ्यादरम्यान कोव्हिडसाठीच्या नियमांचं पालन करण्यात येत असून या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 974 जणांवर पहिल्या दिवशी कारवाई करण्यात आली. यंदा कोरोनाच्या साथीमुळे कुंभमेळा साडेतीन महिन्यांऐवजी 48 दिवस होईल.