Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लखीमपूर खेरी : गदर-2 पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू

death
, सोमवार, 28 ऑगस्ट 2023 (10:07 IST)
कोणाचा काळ कधी आणि कुठे येईल हे सांगू शकत नाही. चित्रपट बघण्यासाठी गेलेल्या तरुणावर काळ झडप घालेल याची कल्पना देखील कोणी केली नसेल. लखीमपूर खेरी येथे शनिवारी सायंकाळी मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. आकस्मिक मृत्यूने मॉलमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 
 
बराच वेळ हाच प्रश्न लोकांच्या मनात घोळत होता की, अखेर असे काय झाले, ज्यामुळे तरुणाला जीव गमवावा लागला. नंतर त्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांची रडून अवस्था बिकट झाली होती.अक्षय तिवारी असे या मयत तरुणाचं नाव आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मोहल्ला द्वारकापुरा येथे राहणारा अक्षत तिवारी (वय 35) हाऔषधांचा व्यवसाय करत होता. महेवगंजमध्ये त्यांचे मेडिकल स्टोअर आहे. अक्षत तिवारी शनिवारी फन मॉलमध्ये गदर-2 चित्रपट पाहण्यासाठी गेला होता.
 
अक्षत मोबाईलवर बोलत असताना मॉलमध्ये प्रवेश करणार असताना अचानक तो जमिनीवर कोसळला. घटनास्थळी उपस्थित लोकांना काही समजण्यापूर्वीच अक्षतचा मृत्यू झाला. तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे लोकांनी सांगितले.

माहिती मिळताच अक्षतचे कुटुंबीय आले.तो जगेल या आशेने त्यांनी त्याला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अक्षतच्या मृत्यूमुळे कुटुंबीय रडून हळहळले आहेत.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 


Edited by - Priya Dixit  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मूल दत्तक घेताय? मग या बाबी तुम्ही लक्षात घेतल्याच पाहिजेत