Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Lakhimpur Violence Case : लखीमपूर हिंसाचारप्रकरणी एसआयटीचा मोठा खुलासा

Lakhimpur Violence Case : लखीमपूर हिंसाचारप्रकरणी एसआयटीचा मोठा खुलासा
, मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (18:05 IST)
उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी एसआयटीने मोठा खुलासा केला आहे. एसआयटीच्या अहवालानुसार, लखीमपूर हिंसाचार सुनियोजित षडयंत्राखाली करण्यात आला होता, हा अपघात नसून हत्येच्या विचारपूर्वक केलेल्या  कटाशी संबंधित हे प्रकरण आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणात आता अपघाताचे कलम हटवून अन्य कलमे लावण्यात आली आहेत.  IPC च्या कलम 120B, 307, 34 आणि 326 मध्ये वाढ करण्यात आली आहे.3 ऑक्टोबर रोजी लखीमपूरमधील टिकुनिया येथे झालेल्या हिंसाचारात 8 जणांचा मृत्यू झाला होता. लखमीपुर हिंसाचारात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र यांच्या वाहन चालकाची देखील हत्या केली गेली. 
लखमीपुर हिंसाचार प्रकरणात गृहराज्य मंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा आशिष मिश्र हा मुख्य आरोपी असून पोलिसांनी त्याला अटक केली असून सध्या तो तुरुंगात आहे. घटनेच्या वेळी तो तिथे नसल्याचा दावा अजय मिश्र यांनी केला आहे.
सीजेएम न्यायालयात एसआयटीच्या वतीने एक अर्ज देण्यात आला आहे, ज्यामध्ये कलमे बदलण्यास सांगितले आहे कारण ही घटना हत्येच्या उद्देशाने करण्यात आली आहे. ही घटना नियोजित पद्धतीने घडवली आहे. सध्या संपूर्ण अहवाल न्यायालयात सादर झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. या हिंसाचार प्रकरणाचा तपास एसआयटी आणि यूपी सरकारचे आयोग दोघे ही करत आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऋतूराजचा शतकी चौकार