चारा घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांना रांचीतून दिल्ली येथे उपचारासाठी आणले गेले. यावेळी काही पत्रकारांनी त्यांना तिसर्या आघाडीबाबत विचारले, तेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वाशिवाय तिसरी आघाडी अशक्य आहे असे वक्तव्य लालूप्रसाद यादव यांनी केले. भाजपविरोधात एकजूट करायची असेल तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे, असे लालूप्रसाद यांनी म्हटले आहे.
अखिलेश यादव आणि मायावती हे एकत्र आल्याचा मला आनंद झाला, अशीही प्रतिक्रिया लालूप्रसाद यांनी दिली. तिसर्या आघाडीबाबत त्यांना विचारले असता मी तिसरी आघाडी काँग्रेसशिवाय मानूच शकत नाही, असे लालूप्रसाद यांनी म्हटले आहे. कारण काँग्रेसचे नेतृत्व असेल तरच तिसर्या आघाडीला दिशा मिळेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले.