सध्या मोबाईलचा वापर सरार्स झाला आहे. आणि लोक सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करत आहे. सध्या सोशल मीडियावर जास्त लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतात. कधीकधी मिळालेली लोकप्रियता देखील घातक ठरू शकते. असेच काहीसे घडले आहे. सुलतानपूर येथे.
इंस्टाग्रामवर पत्नीची वाढती लोकप्रियता तिच्या मृत्यूचे कारण ठरली. त्या महिलेचे इंस्टाग्रामवर खूप फॉलोअर्स होते. त्यामुळे नवरा खूप चिडायचा. भाष्य करायचा. यामुळे संतापलेल्या पत्नीने पतीला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केले होते. पतीलाही पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या पत्नीला भेटायला इंस्टाग्राम मित्र येतात असे त्याला वाटायचे. या सगळ्या संशयामुळेच 15 वर्षांपूर्वी ज्या मुलीच्या प्रेमात पडून त्याने प्रेमविवाह केला होता, तिचा गळा आवळून खून करण्यात आला. पतीने आपल्या दोन मुलांसमोर कारमध्ये हे कृत्य केले.
मोनिका गुप्ता असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. वय सुमारे 32 वर्षे होते. राहुल मिश्रा (37 वर्षे) असे तिच्या पतीचे नाव आहे. तो लखनौ मध्ये आपल्या कुटुंबासह राहत होता. दोघांनी 15 वर्षांपूर्वी 2008 मध्ये प्रेमविवाह केला होता. मोनिका ही रायबरेली येथील रहिवासी होती. तर राहुल मिश्रा हा उन्नावचा रहिवासी आहे. प्रेमविवाहानंतर दोघेही लखनौमध्ये राहू लागले. राहुल हा लखनौमध्येच टूर अँड ट्रॅव्हल एजन्सीचा मालक आहे. या दोघांना एक मुलगा 12 वर्षाचा आणि एक मुलगी 5 वर्षाची आहे.
कुटुंबीयांनी सांगितले की,13 ऑगस्टच्या रात्री राहुल लखनऊहून रायबरेली येथील मोनिकाच्या मामाकडे जाण्यासाठी त्याच्या इनोव्हा कारमधून निघाले होते. दोन्ही मुलं सोबत होती. मात्र वाटेत रायबरेलीकडे जाण्याऐवजी इनोव्हा कार घेऊन पूर्वांचल एक्स्प्रेसच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली. त्याच पूर्वांचल एक्स्प्रेसमध्ये त्यांनी सुलतानपूर भागातील मुजेश चौरस्त्यावर गाडी थांबवली . यानंतर कारमध्येच आपल्या दोन्ही मुलांसमोर पत्नी मोनिकाचा गळा आवळून खून करण्यात आला. मुलं मदतीसाठी ओरडत राहिली. मात्र त्या निर्जन ठिकाणी आणि महामार्गावर एकही वाहन थांबले नाही.
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी राहुल दोन्ही मुले आणि त्यांच्या आईच्या मृतदेहासह कारमध्ये कोंडून ठेवला. रात्री या महामार्गावर जवान गस्त घालत असताना त्यांना एक कार बराच वेळा पासून तिथे उभी दिसली या कारचा अपघात झालेला नाही काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी ते कार जवळ गेले असता त्यांनी कारचे दार उघडल्यावर दोन्ही मुले रडत होती आणि मोनिकाचा मृतदेह पडला होता. दोन्ही मुलांनी आईचा वडिलांनी गळा आवळून खून केल्याचे सांगितले.मुलांनी सांगितल्याप्रमाणे पोलिसानी आरोपी राहुलला ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपी पतीकडे हत्येचे कारण काय म्हणून चौकशी केली असता त्याने धक्कादायक खुलासा केला. त्याने सांगितले की मोनिका दिसायला खूप सुंदर होती आणि ती सोशल मीडियावर सक्रिय असायची. 15 वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर तो व्यवसायात व्यस्त होता, तर त्याची पत्नी इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर सक्रिय होती. तिचे फॉलोअर्स सतत वाढत होते. अशा स्थितीत तो पत्नीवर संशय घेऊ लागल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झाले.
आता राहुलने पत्नीला तिच्या इन्स्टाग्रामवर फॉलो करून त्याची अॅक्टिव्हिटी तपासण्यास सुरुवात केली. हे जाणून मोनिकाने पतीला ब्लॉक केले. त्यामुळे राहुलचा संशय बळावला. अखेरीस, मोनिका तिच्या सोशल मीडिया मित्रांनाही भेटत असल्याचा संशय त्याला येऊ लागला. त्यामुळेच त्याच्या हत्येचा कट रचला. 13 ऑगस्टच्या रात्री लखनौहून बरेलीला जात असताना वाटेतच त्याने पत्नीची हत्या केली. आता याप्रकरणी मोनिकाच्या वडिलांनी आरोपी पती राहुलविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी राहुल ला अटक केली आहे.