Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज म्हणाले - गाईचे शेण आणि गौमुत्राने देशाची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज म्हणाले - गाईचे शेण आणि गौमुत्राने देशाची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते
, रविवार, 14 नोव्हेंबर 2021 (11:46 IST)
गायीचे शेण आणि मूत्राचा वापर करून देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली जाऊ शकते, असे मत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केले आहे. भोपाळमध्ये भारतीय पशुवैद्यकीय संघटनेच्या महिला शाखेच्या अधिवेशनाला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. जर योग्य व्यवस्था यासाठी अवलंबविली तर गायी, तिचे शेण आणि मूत्र देश आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यास मदत करू शकते, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले
कार्यक्रमात उपस्थित पशुवैद्यकीय डॉक्टरांना संबोधित करताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, 'गाय/बैलाशिवाय काम चालू शकत नाही'. सरकारने गोशाळा बांधल्या, पण जोपर्यंत समाज जोडला जाणार नाही, तोपर्यंत सरकारी गोशाळाचा काही उपयोग नसणार . मध्य प्रदेशात ज्योत जागविण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,  इच्छा असल्यास आपण गायीचे शेण आणि  गोमूत्रासह  स्वतःची अर्थव्यवस्था मजबूत करून देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकतो. आपल्याला ते स्थापित करावे लागेल. 
गेल्या वर्षी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गाईचे दूध, शेण आणि गोमूत्र यांचा वापर निरोगी समाजासाठी आवश्यक असल्याचे सांगत त्याच्या वापरावर भर दिला होता.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चोरट्याने प्रथम देवाचेपाया पडून आशीर्वाद घेतला, नंतर दानपेटी चोरून नेली