Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मायावतींच्या आईचे निधन, अंत्यसंस्कारासाठी BSP सुप्रिमो दिल्लीत पोहोचल्या

मायावतींच्या आईचे निधन, अंत्यसंस्कारासाठी BSP सुप्रिमो दिल्लीत पोहोचल्या
, शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (18:07 IST)
बसपा प्रमुख मायावती यांच्या आई रामरती यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. मायावती स्वतः दिल्लीला रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे. तिथे त्या त्यांच्या आईच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहे. बसपा नेते सतीश चंद्र मिश्रा यांनी या दु:खद बातमीची माहिती दिली आहे.
 
मायावतींच्या आईला हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यामुळेच त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे त्यांनी ट्विट करून सांगितले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी हे जग सोडले. सध्या बसपा सुप्रीमो दिल्लीला रवाना झाल्या आहेत. त्या त्यांच्या आईच्या अंत्यसंस्काराला जाणार आहे. कुटुंबीयांच्या मेळाव्यानंतर मायावतींच्या आईवर उद्या दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  
 
या दु:खद वृत्तावर बसपने एक प्रसिद्धीपत्रकही जारी केले आहे. असे सांगण्यात आले आहे की बसपा सुप्रिमो यांची आई खूप मैत्रीपूर्ण होती आणि नेहमी त्यांच्या कुटुंबाच्या जवळ राहिली. त्या त्यांच्या शेवटच्या क्षणी कुटुंबासोबत राहिल्या आणि नेहमी त्यांचा विचार करत असे. मात्र शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. तसे, सुमारे एक वर्षापूर्वी मायावतींचे वडील प्रभू दयाल यांचेही निधन झाले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Sports Awards 2021: टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारे नीरज चोप्रा, मिताली राज आणि पीआर श्रीजेश यांना खेलरत्न पुरस्कार मिळाला