Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 3 March 2025
webdunia

Manmohan Singh Death डॉ. मनमोहन सिंग यांची अंतिम यात्रा निगम बोध घाटावर पोहचली

Manmohan Singh
, शनिवार, 28 डिसेंबर 2024 (11:32 IST)
Manmohan Singh Death : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार होणार आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयातून निगम बोध घाटाकडे रवाना झाले आहे. 

त्यांच्या पार्थिवावर राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. काही वेळातच येथून त्यांचा शेवटचा प्रवास सुरू होईल. डॉ.सिंग यांच्या अखेरच्या यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा अखेरचा प्रवास काँग्रेस कार्यालय ते अकबर रोड मार्गे इंडिया गेट, इंडिया गेट ते टिळक मार्ग, टिळक मार्ग असा निघणार आहे. डॉ.मनमोहन यांच्या पार्थिवावर निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार होणार आहे. शेवटच्या प्रवासात काँग्रेस नेते राहुल गांधी हे डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबासह लष्कराच्या सेरेमोनिअल ट्रकवर उपस्थित आहे.

मनमोहन सिंग यांची अंतिम यात्रा निगम बोध घाटावर पोहचली 
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची अंतिम यात्रा निगम बोध घाटावर पोहचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे. 

अमित शाह पोहचले निगम बोध घाटावर 
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे पार्थिव शरीर निगम बोध घाटावर पोहचले आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हे देखील निगम बोध घाटावर पोहचले. 
 
पंतप्रधान मोदी आणि इतरांनी श्रद्धांजली वाहिली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निगम बोध घाटावर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधानांसोबतच अमित शहा, जेपी नड्डा आणि राजनाथ सिंह यांनीही मनमोहन सिंग यांचे पार्थिव पाहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चंद्रपुरात दोन दुर्मिळ अस्वलांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू