Publish Date: Mon, 14 May 2018 (08:34 IST)
Updated Date: Mon, 14 May 2018 (08:35 IST)
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आपण सुखरुप असून आपल्यावरील उपचार यशस्वी होत असल्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. “माझ्यावर सुरु असलेले उपचार यशस्वी होत असून, मी काही आठवड्यात तुमच्यासोबत असेन”, असं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं आहे. गोव्यात भाजपचं कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या संमेलनात मनोहर पर्रिकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या मनोहर पर्रिकर यांच्यावर सध्या अमेरिकेत उपचार सुरु आहेत.