उत्तर प्रदेश 'फत्ते' केल्यानंतर भाजपचे आमदार आज शनिवारी (18 मार्च) विधिमंडळातील पक्षनेत्याची निवड करणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत रेल्वे राज्यमंत्री यांचे नाव आता आघाडीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची सिन्हांच्या नावाला पहिली पसंती असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मनोज सिन्हा यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत न सल्याचे स्पष्ट केले आहे. या शर्यतीत कोण आहे, याबाबत काहीच माहिती नाही आणि मी या शर्यतीत नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान आज लखनौमध्ये भाजपच्या आमदारांची बैठक होणार आहे. त्यात अंतिम निर्णय होणार आहे, असेही सूत्रांकडून समजते. आयआयटी बनारस हिंदू विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या मनोज सिन्हांची प्रतिमा स्वच्छ आहे.