आजच्या काळात 500 रुपयाला काय किंमत आहे हे सर्वांनाच माहीत आहे परंतू नोटबंदीमुळे परिस्थिती बदली आहे. जिथे एवढ्या पैशात एक कुटुंब सिनेमादेखील बघू शकत नाही तिथे एवढ्या लग्न संपन्न होत आहे.
सोशल मीडियावर एका जोडप्याची कहाणी लोकांना खूप पसंत पडत आहे. गुजरातच्या सूरत येथील एका जोडपं नोटबंदीचा असा शिकार झालं की त्याची खूप चर्चा सुरू आहे. आपणही जाणून घ्या त्यांचे लग्न 500 रुपयात कसे संपन्न झाले ते.
या लग्नात पाहुण्यांना केवळ पाणी आणि चहाची मेजवानी केली गेली. दोन्ही कुटुंबांनी यावर आपली सहमती दर्शवली आणि इंटरनेटवरही या लग्नाचे कौतुक होत आहे.