Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मथुरा पोलिसांच्या गणवेशावर श्रीकृष्णाचा फोटो

मथुरा पोलिसांच्या गणवेशावर श्रीकृष्णाचा फोटो
उत्तर प्रदेश सरकारकडून मथुरा पोलिसांना नवीन गणवेश देण्यात येणार आहे. या गणवेशावरील लोगोमध्ये भगवान श्रीकृष्णांचा फोटो असेल. तसेच पर्यटन पोलिस असा उल्लेखही करण्यात येणार आहे. योगी सरकारच्या या निर्णयाला विरोध होत आहे. 
 
मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ सरकारने अलिकडेच मथुरेला पवित्र धार्मिक स्थळ म्हणून घोषित केले होते. त्यात आता पोलिसांना नवीन गणवेश देण्यात येणार आहे. त्यावरील लोगोमध्ये श्रीकृष्णाचा फोटो छापण्यात येणार आहे.
 
रँकनुसार पोलिसांच्या गणवेशावर बिल्ला लावणार आहेत. पोलिसांना आणखी टूरिस्ट फ्रेंडली करण्याचा या मागचा उद्देश आहे, असे पोलिस अधिक्षकांनी सांगितले. पोलिस महासंचालकांकडे या संबंधीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यांच्याकडून परवानगी मिळताच लोगोचे डिझाईन निश्चित केले जाईल.
 
लोगोला परवानगी देऊ नये तसे झाल्यास उत्तर प्रदेश पोलिसांची धर्मनिरपेक्ष प्रतिमा खराब होईल, असे तत्कालीन पोलिस महासंचालक बृजलाल यांनी सांगितले. काँग्रेसनेही सरकारवर टीका केली आहे. देश धर्मनिरपेक्ष आहे. सरकारने कोणत्या एका धर्माचा प्रचार आणि प्रसार करु नये. अशा प्रकारचा लोगो घटनेच्या विरोधात आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते विवेक बन्सल म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लग्नमंडपात घुसला वाघ