Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

लग्नमंडपात घुसला वाघ

लग्नमंडपात घुसला वाघ
नागपूर- कटंगी वनक्षेत्रातील एका वाघाने मध्य प्रदेशसह महाराष्ट्रातही दहशत माजवली आहे. तो मध्य प्रदेशातील एका गावात लग्नमंडपात घुसला. वाघाला बघून वर्‍हाडी मंडळींमध्ये घबराहट पसरली. आरडाओरड आणि पळापळीमुळे गोंधळ उडाला. मध्य प्रदेशात लग्नमंडपात धुमाकूळ घातल्यानंतर वाघाने राज्याची वेस ओलांडून महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश केला.
 
नागपूरमधील नाकाडोंगरी परिसरात त्याने एका महिलेवर हल्ला केला. शांताबाई असे या महिलेचे नाव असनू त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तुमसर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक दहशतीखाली आहेत. या वाघाने गावात घुसून महिलेवर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. वाघाच्या हालचालींवर नजर ठेवून आहोत, असे बालाघाटच्या वनाधिकार्‍यांनी सांगितले. तर वाघाला पकडण्यासाठी तीन पथके स्थापन करण्यात आली आहेत, असे भंडार्‍याच्या वनाधिकार्‍यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमरनाथ गुहेत शांतता झोन केलेला नाही…