Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

RBI देणार पैसे

RBI देणार पैसे
, बुधवार, 6 मार्च 2024 (12:17 IST)
एक पोर्टल नुकतेच रिझर्व्ह बँकेनं लाँच केलं असून, आता तुमचे बँकेच अडकलेले पैसे या पोर्टलच्या माध्यमातून रत करण्यात येणार आहेत. विविध स्तरांवर आर्थिक व्यवहार बँकेत खातं सुरु केल्यानंतर केले जातात. पैशांची विभागून गुंतवणूक आणि ठेव एकाहून अधिक खातीही बँकेत सुरु करून त्यामध्ये सुरु केली जाते.काही प्रसंग असे येतात जेव्हा अनावधानानं किंवा काही तांत्रिक बाबींमुळं बँकेत असणारे पैसे काढणं शक्य होत नाही. हाच प्रश्न तुम्हालाही पडतोय का की, तुमचे किंवा तुमच्या ओळखीतील एखाद्या व्यक्तीचे पैसे बँकेत अडकून राहिल्यास ते परत कसे मिळवायचे. सुरु करून विस्मरणात गेलेलं एखादं बँक खातं लक्षात आलं किंवा आजी-अजोबांच त्यात असणारे पैसे आता नेमके काढायचे कसे? या प्रश्नाचं उत्तर आता आरबीआयनंच दिलं आहे. नुकतंच एक पोर्टल RBI नं लाँच केलं आहे,जिथं तुम्ही जुने आणि दावा न केलेले थोडक्यात अनक्लेम्ड डिपॉजिट्स काढू शकता. म्हणजे खात्यातून पैसे काढू शकतात.आरबीआयकडून 30 बँकांची यादी जारी करण्यात आली आहे. एकदा पाहून घ्याल यामध्ये तुमच खात तर नाही आहे. 
 
अॅक्सिस, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक या आणि अशा अनेक बँकांची नावं आरबीआयनं जारी केलेल्या यादीमध्ये आहेत. अनक्लेम्ड डिपॉजिट्समधील पैसे काढण्याची सुविधा ग्राहकांना UDGAM portal च्या माध्यमातून प्राप्त असेल. तसेच अजुन काही बँकांची नावे येत्या काही काळात या यादिमध्ये जोडली जाण्याची शक्यता आहे. या पोर्टलमध्ये जउन तुम्ही सर्वप्रथम नवनोंदणी करणे अपेक्षित आहे. खात्यात काही वर्षांपासून असणारी जमा रक्कम तुम्हाला परत केली जाणार आहे. तसेच या पोर्टलच्या मदतीने तुम्ही एकाच वेळी अधिक बँकांमधील खाती शोधून अनक्लेम्ड डिपॉजिट्सची रक्कम मिळवू शकतात. 
 
आरबीआय देशातील सर्वोच्च बँक असून माहितीनुसार लाँच करण्यात आलेल्या पोर्टलवर तीस बँकांची नावे समविष्ट करण्यात आली आहे. तसेच या बॅंकेकडे एकूणअनक्लेम्ड डिपॉजिटची जवळपास 90 टक्के रक्कम जमा आहे तसेच तपशीलाची आणि काही खासगी माहिती पूर्तता केल्यानंतर ही रक्कम मिळवण्यास तुम्ही पात्र असाल. आरबीआयकडून देशातील विविध बँकांमध्ये मार्च 2023 पर्यंत साधारण 42,270 कोटी रुपये इतके अनक्लेम्ड डिपॉझिट असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी सिलिंडरचा स्फोट, पाच जणांचा मृत्यू