rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वानराने चालवली बस, सोशल मीडियावर व्हायरल, बसचालक निलंबित

national news
कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची (KSRTC) बस वानराने चालवली असल्याचा एक व्हिडिओ  सध्या सोशल मीडियावर  व्हायरल  झाला आहे. यात  बस ड्रायव्हर सीटवर बसलेलाही दिसतोय. सोबतच वानर स्टेयरिंगवर बसलंय आणि त्यानंच स्टेयरिंग सांभाळल आहे. हे प्रकरण १ ऑक्टोबरचं आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, देवनगरे डिव्हिजनच्या या बस ड्रायव्हरचं नाव प्रकाश सांगण्यात येतंय. KSRTC प्रशासनासमोर हे प्रकरण आल्यानंतर त्यांनी बेपर्वाईचा आरोप लावत त्यांनी बस ड्रायव्हरला निलंबित केलंय. 
 
एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, हे वानर अनेकदा आपल्या शिक्षकासोबत या मार्गावरून प्रवास करत होता. त्यावेळी हे वानर ड्रायव्हरजवळ जाऊन बसलं.काही प्रवाशांनी त्याला तिथून हटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते हटलं नाही. मग प्रवाशांनी त्याचा व्हिडिओ बनवत सोशल मीडियावर टाकला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बस दरीत कोसळून अपघात, २० ठार, १३ जखमी