Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘मुघल गार्डन’ आता ‘अमृत उद्यान’, असा आहे या गार्डनचा इतिहास

‘मुघल गार्डन’ आता ‘अमृत उद्यान’, असा आहे या गार्डनचा इतिहास
, रविवार, 29 जानेवारी 2023 (15:49 IST)
नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनातलं हे ऐतिहासिक मुघल गार्डन सध्या चर्चेत आहे.
मुघल गार्डन असं त्याचं अधिकृत नाव नसलं, तरी सर्वसाधारणपणे याच नावाने हे उद्यान ओळखलं जात असे. हे उद्यान आता अमृत उद्यान म्हणून ओळखलं जाईल असं राष्ट्रपती भवन कार्यालयानं जाहीर केलंय.
 
ब्रिटिशांनी कोलकात्याहून नव्यानं उभारलेल्या नवी दिल्लीत राजधानी हलवली, तेव्हा व्हॉईसरॉयसाठी उभारलेल्या राजवाड्‌यातत 1928-29 मध्ये ही बाग तयार करण्यात आली. पुढे या निवासस्थानाचं राष्ट्रपती भवनात रुपांतर करण्यात आलं.
 
15 एकरावररील या उद्यानामागे जम्मू-कश्मीरची मुघल गार्डन, ताजमहलभोवतीचा बगीचा, जुनी पेंटिंग्स यांचा आधार घेण्यात आला. पर्शियन म्हणजे फारशी बगिच्यांच्या शैलीपासून प्रेरणा घेऊन या बागा तयार करण्यात आल्या.

नवी दिल्लीचे मुख्य आर्किटेक्ट एडविन ल्युटेन्स आणि त्यांचया हाताखाली काम करणारे उद्यान विभागाचे संचालक विल्यम मुस्टो यांनी सल्लामसलत करून इंग्रजी आणि मुघल अशा दोन पंरपररांच्या संगमातून मुघल गार्डन तयार करायचं ठरवलं. मुस्टो यांनीच या उद्यानाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली.
 
हा काही साधा बगिचा नाही. इथे जगभरतली कित्येत सुंदर, सुवासिक आणि प्रसिद्ध पुष्पं आहेत. ती बहरतात तेव्‌हा निसर्गानं रांगोळी काढल्याचाच भास व्हावा. त्यात नेदरलँड्सची ट्युलीप, ब्राझिलचे ऑर्किड, जपानचं चेरी ब्लॉसम आणि इकेबानासाठी वापरली जाणारी फुलं, चीनमधील कमळं आहेत. या बागेत मुघल शैलीत उभारलेली कारंजी, छोटे पाट आणि फुलझाडांचा युरोपियन फुलं, हिरवळीसोबत संगम झालेला दिसतो
 
गुलाब ही या उद्यानाची खासियतत आहे. इथे गुलाबाच्या 159 प्रजाती आहेत ज्याचं एडोरा, मृणालिनी, ताज महल, आयफल टॉवर, मॉडर्न आर्ट, ब्लॅक लेडी, पॅराडाइज, ब्लू मून आणि लेडी एक्सचा समावेश आहे.
या बागेत मदर टेरेसा, राजा राममोहन राय, जॉन एफ, केनेडी, महाराणी एलिझाबेथ, क्रिश्चियन डायोर अशा प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाचे गुलाबही आहेत. इथे महाभारतातल्या अर्जुन आणि भीमाच्या नावाची फुलंही हेत. बोगनवेली, गुलबहार, एलाइसमच्या रांगा आहेत. बहावा, पारिजात असे वृक्ष हेत.
 
अनेक माजी राष्ट्रपती किंवा कधीकधी त्यांच्या कुटुंबीयांनीही या बागेत भर घातली आहे. दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या सूचनेवरून इथे हर्बल गार्डन,  दृष्टिहीनांसाठी टॅक्चर गार्डन, संगीतमय बाग, जैवइंधन पार्क आणि पोषक बाग अशा बागा जोडण्यात आल्या.
 
के आर नारायणन यांनी इथे रेनन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम आणली. देशाचे तिसरे राष्ट्रपती झाकीर हुसैन यांनी परदेशातून अनेक गुलाबांच्या जाती इते आणल्या आणि ग्रीनहाऊस तयार केलं.
 
 राष्ट्रपती भवनातली माळीकाम करणारी टीम हे उद्‌यान कायम ताजंतवानं ठेवायचं काम करते. सैनी जातीचे हे कर्मचारी तीन पिढ्यांपासून इथं काम करत आहेत. 
मुघल शैलीत तयार केलेल्या उद्यानाचं नाव आता अमृत उद्यान असं करण्यात आलंय. स्वातंत्र्याला 75 वर्षं होत असल्यानं हे नाव दिल्याचं राष्ट्रपती भवनानं जाहीर केलंय.
 
गेल्या काही काळात दिल्लीतील काही महत्त्वाच्या ठिकाणांना असलेलं मुघल शासकांचं नाव बदलण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे राजपथचं कर्तव्यपथ, रेसकोर्स रोडचं लोककल्याण मार्ग असं नामकरण करण्यात आलं होतं. या यादीत आता मुघल गार्डन्सचाही समावेश झाला आहे.
 
'मुघल गार्डन'चं नाव आता 'अमृत उद्यान'
नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनमधील मुघल गार्डन नावाने प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक उद्यानाचं नाव आता बदलण्यात आलं आहे.
 
या उद्यानाला अमृत उद्यान संबोधण्यास आम्हाला आनंद वाटतो, असं राष्ट्रपती भवन कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
 
 28 जानेवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक प्रसिद्धीपत्रक पोस्ट करून हे उद्यान सुरू होणार असल्याबाबत घोषणा करण्यात आली. यावेळी या प्रसिद्धीपत्रकार ‘मुघल गार्डनचं नाव बदलणार’ अशी थेट घोषणा केली नाही. मात्र, वेगळ्या पद्धतीने याची माहिती सर्वांना देण्यात आली.
 
यामध्ये, “स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा केला जात असताना राष्ट्रपतींना राष्ट्रपती भवन उद्यानाला अमृत उद्यान या नावाने संबोधण्यास आनंद होत आहे,” असं सांगण्यात आलं आहे.
राष्ट्रपती भवनातील हे उद्यान यापूर्वी मुघल गार्डन नावाने संबोधलं जायचं. मुघल गार्डन असं त्याचं अधिकृत नाव नसलं तरी सर्वसाधारणपणे ते याच नावाने पूर्वी ओळखलं जात असे.
 
गेल्या काही काळात दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणांचं नाव बदलण्यात आलं आहे. त्यामध्ये काही ठिकाणांना असलेलं मुघल शासकांचं नाव बदलण्यात आलं आहे.
 
उदाहरणार्थ, दिल्लीतील औरंगजेब रोडचं नाव बदलून एपीजे अब्दुल कलाम रोड असं करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे राजपथचं नाव बदलून नुकतेच कर्तव्यपथ असं करण्यात आलं होतं. तसंच रेसकोर्स रोडचं नाव बदलून लोककल्याण मार्ग असंही करण्यात आलं होतं.
 
या यादीत आता मुघल गार्डन्सचाही समावेश झाला आहे.
 
Published By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कॅप्टन कूल माही चित्रपट निर्माता, पहिल्या तमिळ चित्रपटाचे पोस्टर रिलीज