Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अहो आश्चर्यम् , गावातील प्रत्येकाचा जन्म १ जानेवारीला

अहो आश्चर्यम् ,  गावातील प्रत्येकाचा जन्म १ जानेवारीला

उत्तराखंडच्या हरिद्वारपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या खाटा गावात आधार क्रमाकांशी संबंधित नवा घोळ समोर आला आहे. आधार क्रमांकानुसार गावातील प्रत्येक नागरिकाचा जन्म १ जानेवारीला झाला आहे.

आधार कार्डच्या माहितीनुसार, खाटा गावातील मोहम्मद खान यांची जन्मतारीख 1 जानेवारी आहे. त्यांचे शेजारी अलफदीन यांचीही जन्मतारीख १ जानेवारी आहे. एवढंच नाही तर अलफदीन यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या जन्मतारीखही १ जानेवारी आहे. बरं हे प्रकरण इथेच थांबत नाही. या गावातील 800 कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा जन्म आधार कार्डनुसार १ जानेवारी रोजी झाला आहे. सर्व गावकऱ्यांनी आधार कार्डची नोंदणी करताना ओळखपत्र आणि मतदार ओळखपत्र दिलं होतं. तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर निष्काळजीपणा समोर आला आहे. 

 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रेयसीला कंटाळून कारला श्वान लूक