Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपचा सीबीआयच्या छापासत्राशी संबंध नाही – नायडू

marathi batmaya
नवी दिल्ली , शनिवार, 8 जुलै 2017 (09:19 IST)
राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबीय लक्ष्य ठरलेल्या सीबीआयच्या छापासत्राशी केंद्र सरकार आणि भाजपचा कुठलाही संबंध नाही. कायद्याला अनुसरून सीबीआय कर्तव्य बजावत आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते एम. व्यंकय्या नायडू यांनी दिली. सीबीआयची कारवाई राजकीय सुडबुद्धीतून झाल्याचे म्हणत राजदने मोदी सरकार आणि भाजपवर टीकेची झोड उठवली.
 
त्यावर नायडू यांनी येथे पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. कसली राजकीय सुडबुद्धी? यात भाजपची काय भूमिका? एखाद्यावर कुठला आरोप असल्यानंतर त्याची चौकशी केली जाऊ नये का? आमचे सरकार कुठला हस्तक्षेप करत नसल्याने सीबीआयला पावले उचलण्यास मोकळीक आहे. याआधी सीबीआयला तशी परवानगी नव्हती, असे ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हेलिकॉप्टर अपघातातून मुख्यमंत्री दैव बलवत्तर म्हणून पुन्हा बचावले