Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'राष्ट्रीय लोक समता पार्टी' एनडीएतून बाहेर

'राष्ट्रीय लोक समता पार्टी' एनडीएतून बाहेर
, बुधवार, 12 डिसेंबर 2018 (09:04 IST)
आता बिहारमधील 'राष्ट्रीय लोक समता पार्टी'चे नेते केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा देताना एनडीएतून ते बाहेर पडलेत. त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.२०१९ची लोकसभा निवडणूक सहा महिन्यांवर येऊन ठेपली असताना भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेस आणि लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा सहभाग असलेल्या विरोधी पक्षांच्या आघाडीत जाण्याचा पर्याय आपल्यासमोर आहे, असे उपेंद्र कुशवाह यांनी एनडीएतून बाहेर पडल्यानंतर सांगितले.
 
मोदी सरकारने बिहारसाठी जे आश्वासन दिले होते ते त्यांनी पूर्ण केलेले नाही. बिहारसाठी विशेष पॅकेज देण्याचे जाहीर केले होते, पण आमच्या राज्याच्या पदरात काहीच पडले नाही. शिक्षण आणि आरोग्याच्याबाबतीत बिहारची हीच स्थिती आहे. आपली घोर निराशा केलेय. तसेच मागासवर्गीय समाजांचा घोर विश्वासघात केलाय. बिहार या आमच्या राज्याला केवळ भुलथापा दिल्यात. मोदी सरकारने काहीही केलेले नाही. केवळ नावापुरते मंत्रीपद दिल्याचा आरोप उपेंद्र कुशवाह यांनी यावेळी केला.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Live updates : मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोरम 2018 विधानसभा निवडणुकीचे निकाल