Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

आघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा, येत्या २० फेब्रुवारीला नांदेडमध्ये

combined election publicity meet
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांच्या महाआघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची घोषणा केली आहे. आघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा बुधवारी दि.२० फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये आयोजित केली आहे. या सभेस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीआरपी यांच्यासह महाआघाडीतील घटकपक्षांचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाराष्ट्रप्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
 
नांदेड येथील स्टेडियम परिसरातील इंदिरा गांधी मैदानावर बुधवार दि.२० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित केलेल्या या संयुक्त प्रचार सभेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी खा.मल्लीकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जोगेंद्र कवाडे,माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, गुजरात काँग्रेसचे प्रभारी खा.राजीव सातव, माजी मंत्री रोहिदास पाटील,  माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री आ.डी.पी.सावंत, आदींची उपस्थिती लाभणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आळीवाचे बिजारोपण करून साकारली शिवछत्रपतीची प्रतिमा