केंद्रीय गृहमंत्रालायाने देशभरात सुरु असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर आजापासून दुकाने उघडण्याबाबत निर्णय दिला आहे. त्यात कोणती दुकाने सुरू होतील आणि कोणती बंद राहतील, याबाबत स्पष्ट मार्गदर्शन केले आहे.
ग्रामीण भागामध्ये सर्व दुकाने सुरू राहतील.
ग्रामीण भागामध्ये देखील मॉलमध्ये असलेली दुकाने बंदच राहतील.
शहरी भागामध्ये सर्व स्वतंत्र दुकाने वस्त्यांच्या शेजारची दुकाने आणि वसाहतींमधील सर्व दुकाने सुरू राहणार.
शहरी भागामध्ये देखील मॉलमध्ये असलेली दुकाने बंदच राहतील.
हे बंदच राहणार
बाजारपेठेतील दुकाने, कॉम्प्लेक्समधील दुकाने आणि शॉपिंग मॉल्स.
ई-कॉमर्स कंपन्याना. यात केवळ जीवनावश्यक वस्तूंचीच ऑनलाइन विक्री करता येणार. इतर सर्व वस्तूंची विक्री बंदच राहणार.
दारू आणि इतर गोष्टींची विक्रीही बंदच राहणार
हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोनमध्ये कोणतेही दुकान सुरू राहणार नाही.
शिवाय मास्क लावणे अनिर्वाय असेल आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.