Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

NEET-UG : नीट UG पेपर लीक प्रकरणात सीबीआयने दोघांना अटक केली

arrest
, मंगळवार, 16 जुलै 2024 (18:58 IST)
NEET-UG पेपर लीक प्रकरणात CBI ने मुख्य आरोपीसह दोन जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपींनी झारखंडमधील हजारीबाग येथील नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या ट्रंकमधून पेपर चोरल्याचा आरोप आहे. या दोन अटकेमुळे, वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील लीक, फसवणूक आणि इतर अनियमिततेशी संबंधित प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या एकूण लोकांची संख्या आता 14 वर पोहोचली आहे, असे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.
 
सीबीआय ने आज दोघांना अटक केली असून पंकजकुमार उर्फ आदित्य आणि राजू सिंग असे या आरोपींची नावे आहे. राजू ने पंकजला एनटीए ट्रक मधून पेपर चोरले आणि टोळीच्या इतर सदस्यांना देण्यास मदत केली. राजुला हजारीबाग मधून अटक केली.
 
यापूर्वी, हजारीबाग येथील ओएसिस शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि NEET उमेदवारांना राहण्यासाठी फ्लॅट उपलब्ध करून देणाऱ्या दोन व्यक्तींनाही अटक करण्यात आली होती, जिथून बिहार पोलिसांनी जळलेल्या प्रश्नपत्रिका जप्त केल्या होत्या. याप्रकरणी सीबीआयने सहा एफआयआर नोंदवले आहे.
 
Edited by - Priya Dixit  
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पूजा खेडकर यांचा प्रशिक्षण कालावधी स्थगित करण्याचे महाराष्ट्र सरकारचे आदेश