पूर्वी ज्यांचे आई-वडिल विभक्त झाले असातील तर त्यांना पॅनकार्ड काढण्यासाठी खूप अडचणी येत असत. पॅन कार्ड काढण्यासाठी वडिलांचे नाव बंधनकारक असल्या कारणाने अनेकदा अडचणी निर्माण होत असतं. पण या सर्व अडचणी लक्षात घेऊन आयकर विभागाने अशा लोकांना पॅन कार्ड काढण्यासाठी वडिलांचे नाव देणे बंधनकारक केलेले नाही.
आयकर विभागाने आयकर काद्यातील ११४व्या नियमात बदल करत पॅन कार्डसाठी वडिलांऐवजी आईचे नाव देण्यास मान्यता दिली आहे किंवा वडिलांच्या नावाचा संदर्भ दणे बंधनकारक नसल्याचे सांगितले आहे. वारस नसलेल्या व्यक्तीस अशा गोष्टीतून सूट देण्यात आली आहे. आयकर विभागाचा हा नवा नियम ५ डिसेंबर पासून लागू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. ज्यांची आई सिंगल पेरेंट्स आहे त्याच्यासाठी अर्जामध्ये विशेष राखीव जागा ठेवण्यात येणार आहे.