Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 11 March 2025
webdunia

रोड रोमियोंवर आळा घालण्यासाठी नवे नियम,मुलींना अशी हाक मारणाऱ्यांना तुरुंगवास

jail
, बुधवार, 21 डिसेंबर 2022 (13:28 IST)
महिलांना मुलींना एकटे चालणे आता कठीण झाले आहे. रोड रोमियो वाटेतून जाणाऱ्या एकट्या महिलेवर मुलींवर अश्लील कॉमेंट्स करतात या मुळे त्यांना विनयभंगाला समोरी जावे लागते. अशा असभ्य वर्तन करणाऱ्यांवर कारवाई केल्यांनतर देखील त्यांची वागणूक तशीच असते. या बाबत आता नॅशनल क्राईम इन्व्हेस्टीगेशन ब्युरो NCIB ने ट्विटरवर नवीन माहिती दिली आहे.  NCIB ने ट्विटरवर ट्विट शेअर करत विनयभंगाशी संबंधित कायदे आणि नियमांची माहिती दिली आहे. NCIB ने आपल्या ट्विटर मध्ये सांगितले आहे की, जर एखाद्या रोड रोमियो किंवा व्यक्तीने मुलीला किंवा महिलेला आयटम, डायन, छम्मकछल्लो ,चरित्रहीन असे शब्द उच्चारले किंवा अश्लील हावभाव केले तर असा व्यक्तींना कठोर दंड दिला जाणार त्याला भारतीय दंड अधिनियम 509 च्या अंतर्गत 3 वर्षाचा तुरुंगवास शकतो. 
भारतीय दंड अधिनियमाच्या कलम 354 अंतर्गत एखाद्या महिलेच्या सन्मानाला हानी पोहोचल्यास किंवा तिच्यावर अत्याचार केल्यावर दोषी आढळल्यास त्या व्यक्तीला दोन वर्षाचा तुरुंगवास आणि दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. विनयभंगासाठी कलम 354  आहे. 
 
Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एलोन मस्क देणार ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा