केरळमध्ये पुन्हा घातक आणि अत्यंत दुर्मीळ निपाह व्हायरस संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. केरळमधील एर्नाकुलममध्ये एका व्यक्तीला निपाह विषाणूची लागण झाले आहे. केरळ सरकारने राज्यात अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे.
केरळमधील एर्नाकुलम येथे राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला निपाह विषाणूची बाधा झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून निष्पन्न झाले आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चार जणांनाही ताप आला असून त्यांना देखील देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यात दोन परिचारिकांचा समावेश आहे. या चौघांची प्रकृती गंभीर नसल्याचे सांगितले जाते.
निपाह विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना राबवल्या आहेत. इतर अनेक रुग्णांना आरोग्य विभागाची देखरेखीखाली ठेवले आहे.
निपाह व्हायरस संसर्गात ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात. आरोग्य विभागाकडून नागरिकांबरोबरच रुग्णालयातील डॉक्टर आणि सिस्टर यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोबतच सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे सांगण्यात आले आहे.