Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजीव गांधी नाही, आता खेल रत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या नावे असेल, पंतप्रधान मोदी म्हणाले - देशवासियांच्या विनंतीला मान देऊन हे केले

राजीव गांधी नाही, आता खेल रत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या नावे असेल, पंतप्रधान मोदी म्हणाले - देशवासियांच्या विनंतीला मान देऊन हे केले
, शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (13:33 IST)
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर केले. देशवासीयांच्या विनंतीनंतर हा निर्णय घेतल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून ही घोषणा केली.हा पुरस्कार देशातील सर्वात मोठा क्रीडा सन्मान आहे. 1991-92 मध्ये प्रथमच हा पुरस्कार देण्यात आला.
 
पंतप्रधानांनी ट्विटरवर लिहिले, 'ऑलिम्पिक खेळांमध्ये भारतीय खेळाडूंच्या महान प्रयत्नांमुळे आम्ही सर्व भारावून गेलो आहोत.आमच्या मुला -मुलींनी दाखवलेली इच्छाशक्ती, विशेषतः हॉकीमध्ये, जिंकण्याचा उत्साह वर्तमान आणि भावी पिढ्यांसाठी मोठी प्रेरणा आहे. त्यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिले, 'देशाला अभिमान वाटणाऱ्या क्षणांमध्ये, अनेक देशवासियांची विनंती देखील समोर आली आहे की खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद जी यांना समर्पित केले जावे. लोकांच्या भावना लक्षात घेऊन आता त्याचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे. जय हिंद! ' 
 
टोकियो ऑलिम्पिक भारतीय हॉकी संघासाठी अविस्मरणीय ठरले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने 41 वर्षांनंतर पदक पटकावले, तर महिला संघाने चौथे स्थान पटकावले. दोन्ही संघ कांस्यपदकाच्या सामन्यात पोहचले, पण पुरुष संघ विजयी झाला, तर महिला संघ 3-4 च्या फरकाने पराभूत झाला. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लोकल प्रवास सुरु करण्यासाठी भाजपचं आज मुंबईत ट्रेन भरो आंदोलन