rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बाळगणे चांगलेच महाग पडणार

note bandi
, बुधवार, 28 डिसेंबर 2016 (14:36 IST)
यापुढे चलनातून रद्द करण्यात आलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या  नोटा बाळगणे चांगलेच महाग पडणार आहे. कारण या नोटा बाळगणाऱ्यावर  दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत  वटहुकूम जारी करण्यात आला आहे. यामध्ये 10 पेक्षा जास्त जुन्या नोटा असल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. केंद्रीय केबिनेट बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचा भंग केल्यास किमान 50 हजार किंवा सापडलेल्या रकमेच्या पाचपट रक्कम दंड म्हणून भरावा लागणार आहे. एखादे संशोधन किंवा मुद्राशास्त्रसाठी या नोटा बाळगण्याची परवानगी मिळू शकते. चलनातून बाद करण्यात आलेल्या किंमतीच्या सारख्याच नोटा बाजारात असू नयेत यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सनबर्न फेस्टिव्हलचा मार्ग मोकळा