Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता डावा हातही तुरुंगात जाणार आहे,तुम्ही पोराची काळजी घ्या

kirit somaiya
, बुधवार, 7 सप्टेंबर 2022 (07:42 IST)
संजय राऊत मागील काही दिवसांपासून पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. यानंतर आता माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही तुरुंगात जातील, असं सूचक विधान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे तुमचा उजवा हात तुरुंगात गेला आहे, आता डावा हातही तुरुंगात जाणार आहे, तुम्ही पोराची काळजी घ्या, असं विधान किरीट सोमय्यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
 
भाजपा नेते किरीट सोमय्या हे आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पुण्यातील कसबा गणपतीचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या म्हणाले की, “गेल्यावेळी गणरायाचं दर्शन घेताना मी तुरुंगात जात होतो, आज संपूर्ण महाराष्ट्र तुरुंगातून बाहेर आला आहे, म्हणून गणपतीला धन्यवाद दिला. महाराष्ट्राला विकासाच्या पथावर घेऊन जाण्याची शक्ती दे, अशी प्रार्थना केली.”

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हाफकिनबद्द्ल बोललेलो राजीनामा देतो अस चॅलेंज