Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेस्टॉरन्टमध्ये अर्ध्या प्लेटची ऑर्डर देता येणार?

रेस्टॉरन्टमध्ये अर्ध्या प्लेटची ऑर्डर देता येणार?
हॉटेलमध्ये गेलेल्या ग्राहकाने किती खायचे हे हॉटेल मालक नव्हे, तर खाणारा ग्राहक ठरवू शकेल, असा प्रस्ताव सध्या ग्राहक मंत्रालयाकडून विचाराधीन आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये गेलेल्या ग्राहकांना खाण्याचे प्रमाण स्वत:च ठरवण्याचा अधिकार मिळणार आहे.
 
मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खाण्याचे प्रमाण ग्राहक लीटर किंवा ग्राममध्ये ठरवू शकतात. जगातील अनेक देशांमध्ये या प्रकारची व्यवस्था अस्तित्वात आहे. याच व्यवस्थांचा अभ्यास करून हा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. हॉटेल संघटना आणि ग्राहक संघटना यांच्याशी संवाद साधून हा नियम लागू करण्यात येणार आहे. हा नियम प्रत्यक्षात लागू झाल्यास ग्राहकांच्या खिशाला बसणारा फटका तर कमी होईलच शिवाय देशातील अन्नाची नासाडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.
 
हॉटेलमधील मेन्यू कार्ड पाहताना उजव्या बाजूला असणार्‍या किमतीवर नजर टाकण्यार्‍यांची संख्या प्रचंड मोठी आहे. खाण्याचा पदार्थ कितीही महाग असला तरी त्याचा परिणाम थेट खिशावर होणार असल्याने साहजिकच लोक खाद्यपदार्थांची किंमत पाहूनच ऑर्डर करतात. मात्र, एखादी व्यक्ती एकटीच हॉटेलमध्ये गेल्यास तिला एखादा खाद्यपदार्थ ऑर्डर करताना फुल प्लेटच ऑर्डर करावी लागते. मग संपूर्ण प्लेट खाण्याइतकी भूक लागली असो वा नसो, मात्र आता तुम्हाला जितकी भूक, तितक्याच प्रमाणात खाद्यपदार्थ ऑर्डर करणे शक्य होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चलनस्थिती लवकरच पूर्वपदावर: पटेल