झारखंड येथील पाकुड जिल्ह्यातील एका खासगी शाळेत विद्यार्थ्यांच्या भोजनात पाल आढळल्याने खळबळ उडाली आहे. आहार घेतल्याने 100 हून अधिक विद्यार्थी आजारी पडल्याचे सांगितले जात आहे. या विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीप्रमाणे पाकुडिया प्रखंड स्थित एका प्रायव्हेट शाळेच्या जेवणात पाल पडली होती. ते विषारी जेवण सेवन केल्यानंतर मुलांना उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास सुरु झाला. या आहारामुळे 100 हून अधिक विद्यार्थी आजारी पडल्याचे सांगितले जात आहे.
यानंतर लगेच 60 हून अधिक विद्यर्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले गेल तर 40 हून अधिक विद्यार्थ्यांना स्थानिक सामुदायिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. आता सर्व मुलं धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जात आहे.
हे प्रकरण पाकुडिया प्रखंड क्षेत्रात झरिया गावाचे आहे जिथे रात्री वसतिगृहातील मुलांना दिल्या जाणाऱ्या जेवणात पाल आढळून आल्याचे सांगितले जात आहे. या चुकीमागील कारणाचा शोध घेऊन दोषींवर कारवाई केली जाईल, असे जिल्हा शिक्षा अधिकार्यांनी सांगितले.
photo: symbolic