Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्ताचा सीमारेषेवर गोळीबार सुरु,बीएसएफचा एक जवान शहीद

pakistan attack
, शनिवार, 29 ऑक्टोबर 2016 (09:57 IST)
पाकिस्ताकडून अजूनही सीमारेषेवरील भागांमध्ये गोळीबार सुरु आहे. यात कुपवाडाच्या माछिल सेक्टरमध्ये गस्त घालणा-या लष्करी तुकडीवर दहशतवादी हल्ला झाला असून त्यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला आहे. जम्मू काश्मीरमधील कठुआ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून तोफमारा करत शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे .  याला बीएसएफने चोख प्रत्युत्तर दिले आहे. सीमारेषेवरील तणाव लक्षात घेता सीआरपीएफने काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवली असून चेक पॉईंट्सही वाढवले आहेत. 
 
दरम्यान पाकिस्तानी फौजांकडून आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेलगत होत असलेल्या हल्ल्याला चोख उत्तर दिले आहे. भारतीय सीमा सुरक्षा दलाने १५ पाकिस्तानी रेंसर्जचा खात्मा केला आहे. पाकच्या काही चौक्याही उद्ध्वस्त करण्यात आल्या. सीमेपलीकडून हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली स्फोटके पाहता पाकिस्तानी लष्कर या रेंजर्सना मदत करीत आहे असा दावा बीएसएफने केला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज केवळ ऑनलाइन स्वीकारण्याची अट शिथिल